Chris Anderson: William, hi. Good to see you.
ख्रिस ए. : विल्यम, तुला पाहून बरे वाटले.
William Kamkwamba: Thanks.
वि.काम्क्वम्बा : आभार
CA: So, we've got a picture, I think? Where is this?
क्रि. ए. : तर, मला वाटते आपल्याजवळ एक चित्र आहे, कुठे आहे हे ?
WK: This is my home. This is where I live.
वि. का.: हे माझे घर आहे. इथे मी राहतो.
CA: Where? What country?
क्रि. ए.: कुठे? कुठल्या देशात?
WK: In Malawi, Kasungu. In Kasungu. Yeah, Mala.
वि. का.: मालावी मध्ये कुसंगु. कुसंगु मध्ये. होय मालावी.
CA: OK. Now, you're 19 now?
क्रि. ए.: बरं, तू आत्ता १९ वर्षांचा आहेस ?
WK: Yeah. I'm 19 years now.
वि. का.: होय. मी १९ वर्षांचा आहे आत्ता.
CA: Five years ago you had an idea. What was that?
क्रि. ए.: पाच वर्षापूर्वी तुला एक युक्ती सुचली. काय होती ती?
WK: I wanted to make a windmill.
वि. का.: मला पवन चक्की बांधायची होती.
CA: A windmill?
क्रि. ए.: पवनचक्की?
WK: Yeah.
वि. का.: होय
CA: What, to power -- for lighting and stuff?
क्रि. ए.: कशासाठी, वीज व इतर गोष्टींसाठी?
WK: Yeah.
वि. का.: होय
CA: So what did you do? How did you realize that?
क्रि. ए.: तर कसे केलेस तू हे? कसे काय समजले तुला?
WK: After I dropped out of school, I went to library, and I read a book that would -- "Using Energy," and I get information about doing the mill. And I tried, and I made it.
वि. का.: मी शाळा सोडल्यानंतर, मी वाचनालयामध्ये गेलो आणि मी एक पुस्तक वाचले -- "युझिंग एनर्जी" आणि मला पवनचक्की बद्दल तिथे माहिती मिळाली. आणि मी प्रयत्न केला आणि बनवले.
(Applause)
(टाळ्या)
CA: So you copied -- you exactly copied the design in the book.
क्रि. ए. : तर तू नक्कल केलीस -- तू तंतोतंत पुस्तकामध्ये दिल्याप्रमाणे रचना केलीस.
WK: Ah, no. I just --
वि. का.: अंम, नाही. मी फक्त--
CA: What happened?
क्रि. ए. : काय झालं?
WK: In fact, a design of the windmill that was in the book, it has got four -- ah -- three blades, and mine has got four blades.
वि. का.: खरं तर, पुस्तकामधील पवनचक्कीच्या रचनेत, त्याला चार -- अं-- तीन पाती आहेत. आणि माझ्यात चार पाती लागली आहेत.
CA: The book had three, yours had four.
क्रि. ए. : पुस्तकात तीन होती, तर तुझी चार.
WK: Yeah.
वि. का.: होय.
CA: And you made it out of what?
क्रि. ए. : आणि तू ते कशापासून बनवलेस?
WK: I made four blades, just because I want to increase power.
वि. का.: मी चार पाती वापरली कारण मला जास्त वीज पाहिजे होती.
CA: OK.
क्रि. ए. : बरं.
WK: Yeah.
वि. का.: होय.
CA: You tested three, and found that four worked better?
क्रि. ए. : तू तीन पडताळलीस पण चार आवडली?
WK: Yeah. I test.
वि. का.: होय. चाचणी केली.
CA: And what did you make the windmill out of? What materials did you use?
क्रि. ए. : आणि तू पवनचक्की कशापासून तयार केलीस? तू कुठली साधन सामग्री वापरलीस?
WK: I use a bicycle frame, and a pulley, and plastic pipe, what then pulls --
वि. का.: मी वापरली सायकलची चौकट, कप्पी, आणि प्लास्टिक पाईप, जो खेचतो..
CA: Do we have a picture of that? Can we have the next slide?
क्रि. ए. : आपल्याकडे त्याचे चित्र आहे का? पुढची स्लाईड पाहूया?
WK: Yeah. The windmill.
वि. का.: हां. पवनचक्की.
CA: And so, and that windmill, what -- it worked?
क्रि. ए. : आणि तर, ही पवनचक्की, काय चालते का?
WK: When the wind blows, it rotates and generates.
वि. का.: वारा जेव्हा वाहतो, तेव्हा ती फिरू लागते आणि वीज तयार होते.
CA: How much electricity?
क्रि. ए. : किती वीज तयार होते?
WK: 12 watts.
वि. का.: १२ वॅट.
CA: And so, that lit a light for the house? How many lights?
क्रि. ए. : तर, ती वीज घरात विजेचे दिवे लावते? किती दिवे?
WK: Four bulbs and two radios.
वि. का.: चार विजेचे दिवे आणि दोन रेडिओ .
CA: Wow.
क्रि. ए. : उत्तम.
WK: Yeah.
वि. का.: होय
(Applause) CA: Next slide -- so who's that?
(टाळ्या)-- क्रि. ए. : पुढची चित्रफीत -- ते कोण आहेत?
WK: This is my parents, holding the radio.
वि. का.: ते माझे पालक आहेत, रेडिओ हातात घेतलेले.
CA: So what did they make of -- that you were 14, 15 at the time -- what did they make of this? They were impressed?
क्रि. ए. : त्यांना याबद्दल काय वाटले? -- जेंव्हा तू १४,१५ वर्षांचा होतास-- त्यांना काय वाटले? ते प्रभावित झाले का?
WK: Yeah.
वि. का.: होय.
CA: And so what's your -- what are you going to do with this?
क्रि. ए. : आणि तू काय करणार आहेस यापासून?
WK: Um --
वि. का.: अं--
CA: What do you -- I mean -- do you want to build another one?
क्रि. ए. : मला म्हणायचे होते की तुला अजून एक बांधायची आहे का?
WK: Yeah, I want to build another one -- to pump water and irrigation for crops.
वि. का.: हां. मला अजून एक बांधायची आहे-- पाणी उपसण्यासाठी आणि पिकांच्या सिंचनासाठी.
CA: So this one would have to be bigger?
क्रि. ए. : तर ही मोठी असावी लागणार?
WK: Yeah.
वि. का.: हां.
CA: How big?
क्रि. ए. : किती मोठी?
WK: I think it will produce more than 20 the watts.
वि. का.: मला वाटते की जी २० वॅट पेक्षा अधिक वीज तयार करेल.
CA: So that would produce irrigation for the entire village?
क्रि. ए. : तर ती संपूर्ण गावाच्या सिंचनासाठी असेल का?
WK: Yeah.
वि. का.: होय.
CA: Wow. And so you're talking to people here at TED to get people who might be able to help in some way to realize this dream?
क्रि. ए. : उत्तम. आणि तू लोकांसमोर बोलत आहेस इथे टेड मध्ये काही लोक जे तुला मदत करू शकतील स्वप्नपूर्ती साठी?
WK: Yeah, if they can help me with materials, yeah.
वि. का.: हां. जर ते मला साधनसामग्री साठी मदत करू शकतील. होय.
CA: And as you think of your life going forward, you're 19 now, do you picture continuing with this dream of working in energy?
क्रि. ए. : आणि भविष्याचा विचार करता, तू आत्ता १९ वर्षांचा आहेस, तू विचार करू शकतोस का, उर्जेवर काम करण्याचं स्वप्न पुढे नेण्याचा?
WK: Yeah. I'm still thinking to work on energy.
वि. का.: होय. मी अजून उर्जेवर काम करण्याचा विचार करत आहे.
CA: Wow. William, it's a real honor to have you at the TED conference. Thank you so much for coming.
क्रि. ए. : छान. विल्यम, तुझी टेड परिषदेमधील उपस्थिती सन्माननीय आहे. आल्याबद्दल खूप आभार.
WK: Thank you.
वि. का.: धन्यवाद.
(Applause)
(टाळ्या)