We are losing our listening. We spend roughly 60 percent of our communication time listening, but we're not very good at it. We retain just 25 percent of what we hear. Now -- not you, not this talk, but that is generally true.
ऐकण्याची क्षमता आपण गमावत आहोत. आपल्या संवादाच्या वेळेपैकी आपण जवळजवळ ६० टक्के वेळ हा श्रवणात घालवतो, तरीही ते समाधानकारक नसते . आपण जे ऐकतो त्याच्या केवळ २५ टक्केच लक्षात राहतं. आता -- आपण किंवा हे व्याख्यान नव्हे पण साधारणपणे हे सत्य आहे.
(Laughter)
(हशा)
Let's define listening as making meaning from sound. It's a mental process, and it's a process of extraction.
आवाजाचा अर्थ शोधणे अशी श्रवणाची व्याख्या करू या. ती एक मानसिक प्रक्रिया आहे, आणि ती माहिती मिळवण्याची प्रक्रिया आहे.
We use some pretty cool techniques to do this. One of them is pattern recognition. (Crowd noises) So in a cocktail party like this, if I say, "David, Sara, pay attention" -- some of you just sat up. We recognize patterns to distinguish noise from signal, and especially our name. Differencing is another technique we use. If I left this pink noise on for more than a couple of minutes, (Pink noise) you would literally cease to hear it. We listen to differences; we discount sounds that remain the same.
आपण त्यासाठी काही सहजसोपी तंत्रं वापरतो. त्यांपैकी एक म्हणजे नमुन्याची ओळख. (गर्दीचे आवाज) यासारख्या एखाद्या पार्टीत, जर मी म्हणालो, " डेव्हिड, सारा लक्ष द्या" -- तुमच्यापैकी काहीजण नुकतेच सावरून बसले. आपण नमुने ओळखतो गोंगाटाला संकेतापासून वेगळं करण्यासाठी आणि खासकरून आपलं नाव. फरक करणे हे अजून एक तंत्र आपण वापरतो. जर मी हा अनियंत्रीत आवाज दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ चालू ठेवला, (अनियंत्रीत आवाज) आपल्याला तो अक्षरशः ऐकू येणार नाही. आपण फरकांचं श्रवण करतो; जे आवाज तसेच राहतात त्यांना आपण सूट देतो.
And then there is a whole range of filters. These filters take us from all sound down to what we pay attention to. Most people are entirely unconscious of these filters. But they actually create our reality in a way, because they tell us what we're paying attention to right now. I'll give you one example of that. Intention is very important in sound, in listening. When I married my wife, I promised her I would listen to her every day as if for the first time. Now that's something I fall short of on a daily basis.
आणि नंतर चाळण्यांची एक पूर्ण श्रेणीच आहे. या चाळण्या सगळ्या आवाजांपैकी आपल्याला ज्याकडे आपण लक्ष देतो तिथे पोचवतात. बहुतांशी लोकांना या चाळण्यांची जाणीव नसते. पण एका अर्थी आपलं वास्तव निर्माण करतात, कारण आपण आत्ता कुठे लक्ष देत आहोत हे ते सांगतात. मी आपल्याला त्याचं एक उदाहरण देतो. आवाजात, श्रवणात उद्देश खूप महत्वाचा आहे. जेव्हा माझं लग्न झालं, मी माझ्या पत्नीला वचन दिलं कि दररोज मी तिचं ऐकेन अगदी पहिल्यांदाच ऐकत असल्यासारखं. आता हि अशी एक गोष्ट आहे ज्यात मी दररोज कमी पडतो.
(Laughter)
(हशा)
But it's a great intention to have in a relationship.
पण नात्यात हवा असणारा हा महान उद्देश आहे.
(Laughter)
(हशा)
But that's not all. Sound places us in space and in time. If you close your eyes right now in this room, you're aware of the size of the room from the reverberation and the bouncing of the sound off the surfaces; you're aware of how many people are around you, because of the micro-noises you're receiving. And sound places us in time as well, because sound always has time embedded in it. In fact, I would suggest that our listening is the main way that we experience the flow of time from past to future. So, "Sonority is time and meaning" -- a great quote.
पण तोच सर्वेसर्वा नाही. ध्वनी आपल्याला अवकाशात आणि वेळेत ठेवतो. जर आत्ता या सभागृहात आपण आपले डोळे बंद केले, तर आपल्याला सभागृहाचे आकारमान कळेल प्रतिध्वनी आणि भिंतींवर आदळून परत येणाऱ्या ध्वनीमुळे; आपल्या आसपास किती लोक आहेत याची आपल्याला कल्पना आहे आपल्याला येणाऱ्या सूक्ष्म आवाजांमुळे. आणि ध्वनी आपल्याला वेळेचीही जाणीव करून देतो, कारण ध्वनीत नेहमीच वेळ हि घट्ट रोवलेली असते. वास्तविक पाहता, मी असं सुचवेन कि आपलं श्रवण हा मुख्य मार्ग आहे ज्यामुळे आपण वेळेचा प्रवाह अनुभवतो भूतकाळाकडून भविष्याकडे. म्हणून, "खणखणीत आवाज हा वेळ आणि अर्थ आहे" -- एक उत्तम वाक्य.
I said at the beginning, we're losing our listening. Why did I say that? Well, there are a lot of reasons for this. First of all, we invented ways of recording -- first writing, then audio recording and now video recording as well. The premium on accurate and careful listening has simply disappeared. Secondly, the world is now so noisy, (Noise) with this cacophony going on visually and auditorily, it's just hard to listen; it's tiring to listen. Many people take refuge in headphones, but they turn big, public spaces like this, shared soundscapes, into millions of tiny, little personal sound bubbles. In this scenario, nobody's listening to anybody.
मी सुरुवातीला म्हणालो आपण श्रवण करणं हरवत आहोत. मी ते का म्हणालो? यासाठी पुष्कळ करणं आहेत. सर्वप्रथम आपण मुद्रणाचे अनेक मार्ग शोधले -- प्रथम लिहिणे, नंतर ध्वनीमुद्रण आणि आता चलतचित्रमुद्रणसुद्धा. अचूक आणि काळजीपूर्वक श्रवणाचं अधिमूल्य निव्वळ नाहीसं झालं आहे. दुसरं म्हणजे, आता जगात इतका गोंगाट आहे, (गोंगाट) या दृश्य आणि श्राव्य कर्णकटू आवाजामुळे श्रवण करणं हे खूप अवघड झालं आहे; श्रवण करणं हे थकवणारं आहे. कित्येक लोक हेडफोन्सचा आसरा घेतात, पण ते यासारख्या मोठ्या सार्वजनिक जागा, सामायिक संगीतिका, लाखो अतिसूक्ष्म वैयक्तिक ध्वनी आभासांत परिवर्तीत करतात. अशा परिस्थितीत, कोणीच कोणाचं ऐकत नसतं.
We're becoming impatient. We don't want oratory anymore; we want sound bites. And the art of conversation is being replaced -- dangerously, I think -- by personal broadcasting. I don't know how much listening there is in this conversation, which is sadly very common, especially in the UK. We're becoming desensitized. Our media have to scream at us with these kinds of headlines in order to get our attention. And that means it's harder for us to pay attention to the quiet, the subtle, the understated.
आपण अधीर होत चालले आहोत. आता वक्तृत्व नको आहे;आपल्याला संभाषणातील निवडक रंजक भाग हवा आहे. आणि संभाषणकलेची जागा -- भीषणतेने, मला वाटतं -- वैयक्तिक प्रसारण घेत आहे. मला ठाऊक नाही या संभाषणात श्रवण किती आहे, जे दुर्दैवाने सगळीकडे आहे, खासकरून UK मध्ये. आपण बधिर होत चाललो आहोत. आपल्या माध्यमांना आपल्यावर या प्रकारच्या मथळ्यांनी किंचाळावं लागतं आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी. आणि त्याचा अर्थ आपल्याला लक्ष देणं अवघड आहे शांत, छान, सूक्ष्म गोष्टींकडे.
This is a serious problem that we're losing our listening. This is not trivial, because listening is our access to understanding. Conscious listening always creates understanding, and only without conscious listening can these things happen. A world where we don't listen to each other at all is a very scary place indeed. So I'd like to share with you five simple exercises, tools you can take away with you, to improve your own conscious listening. Would you like that?
आपण श्रवण करणं हरवत आहोत हि एक गंभीर समस्या आहे. हे क्षुल्लक नाही, कारण श्रवण हा आपल्या आकलनाचा मार्ग आहे. सचेतन श्रवण नेहमी आकलनाची निर्मिती करतं, आणि केवळ त्याच्या अभावामुळे अशा गोष्टी होऊ शकतात. असं जग जिथे आपण एकमेकांचं काहीच ऐकून घेत नाही ती खरोखरच एक भीतीदायक जागा आहे. म्हणून मला आपल्याला पाच साधे उपाय सांगायचे आहेत,ती अशी साधनं जी आपण आपल्यासोबत नेऊ शकता, आपलं स्वतःचं सचेतन श्रवण सुधारण्यासाठी. आपल्याला ते आवडेल का?
Audience: Yes!
श्रोते: हो!
Good. The first one is silence. Just three minutes a day of silence is a wonderful exercise to reset your ears and to recalibrate, so that you can hear the quiet again. If you can't get absolute silence, go for quiet, that's absolutely fine.
उत्तम. पहिलं आहे मौन. दिवसाला केवळ तीन मिनिटांचं मौन हा एक उत्तम उपाय आहे आपल्या कानांना पुनर्जीवित आणि संतुलित करण्याचा जेणेकरून आपल्याला शांतता पुन्हा जाणवू शकेल. जर आपल्याला परिपूर्ण मौन शक्य नसेल, शांतता स्वीकारा, तीसुद्धा उत्तम आहे.
Second, I call this "the mixer." (Noise) So even if you're in a noisy environment like this -- and we all spend a lot of time in places like this -- listen in the coffee bar to how many channels of sound can I hear? How many individual channels in that mix am I listening to? You can do it in a beautiful place as well, like in a lake. How many birds am I hearing? Where are they? Where are those ripples? It's a great exercise for improving the quality of your listening.
दुसरं, मी याला "ध्वनीमिश्रणाचं साधन" म्हणतो. (गोंगाट) मग जरी आपण यासारख्या गोंगाटात असाल -- आणि आपण सारेचजण यासारख्या जागांमध्ये बराचसा वेळ व्यतीत करतो -- कॉफी बारमध्ये मला किती ध्वनीप्रवाह ऐकू येऊ शकतात? त्या मिश्रणातील किती सुटे प्रवाह मला ऐकू येत आहेत? आपण तलावासारख्या सुंदर जागीदेखील ते करू शकता. मला किती पक्ष्यांचा आवाज येतोय? ते कुठे आहेत? ते तरंग कुठे आहेत? आपल्या श्रवणाची गुणवत्ता वाढवण्याचा हा एक खूप छान उपाय आहे.
Third, this exercise I call "savoring," and this is a beautiful exercise. It's about enjoying mundane sounds. This, for example, is my tumble dryer.
तिसरं, या उपायाला मी "रसग्रहण" म्हणतो आणि हा खूप सुंदर उपाय आहे. हा नीरस ध्वनींची मजा लुटण्याबाबत आहे. हा, उदाहरणार्थ, माझा फिरणारा ड्रायर आहे.
(Dryer)
(ड्रायर)
It's a waltz -- one, two, three; one, two, three; one, two, three. I love it! Or just try this one on for size.
ते एक नृत्य आहे -- एक, दोन, तीन; एक, दोन, तीन; एक, दोन, तीन. मला ते आवडतं! किंवा हा ऐकून बघा.
(Coffee grinder)
(कॉफी ग्राइंडर)
Wow! So, mundane sounds can be really interesting -- if you pay attention. I call that the "hidden choir" -- it's around us all the time.
वाह! म्हणजे, नीरस ध्वनी खरंच मनोरंजक वाटतात -- जर लक्ष दिलं तर. मी त्याला "अदृश्य गायकसमूह" म्हणतो -- तो आपल्या भोवती सतत असतो.
The next exercise is probably the most important of all of these, if you just take one thing away. This is listening positions -- the idea that you can move your listening position to what's appropriate to what you're listening to. This is playing with those filters. Remember I gave you those filters? It's starting to play with them as levers, to get conscious about them and to move to different places. These are just some of the listening positions, or scales of listening positions, that you can use. There are many. Have fun with that. It's very exciting.
पुढचा उपाय हा बहुदा या सर्वांपैकी खूप महत्वाचा आहे, जर आपण केवळ एक गोष्ट दूर केली तर. हा आहे श्रवणाची स्थिती -- ती कल्पना ज्यानुसार आपण आपली श्रवणाची जागा बदलू शकता जे आपण ऐकता आहात त्यासाठी योग्य असलेल्या जागी जाण्याची. हे त्या चाळण्यांबरोबर खेळणं आहे. आठवताहेत मी दिलेल्या त्या चाळण्या? ते त्यांना तरफांसारख हलवायला सुरुवात करत आहे त्यांची जाणीव करून घेण्यासाठी व विविध जागांवर हलवण्यासाठी या काही थोडक्या श्रवणाच्या जागा आहेत, किंवा त्यांच्या श्रेणी आहेत, ज्या आपण वापरू शकता. तशा पुष्कळ आहेत. त्यांची मजा लुटा. ते खूप रोमांचक आहे.
And finally, an acronym. You can use this in listening, in communication. If you're in any one of those roles -- and I think that probably is everybody who's listening to this talk -- the acronym is RASA, which is the Sanskrit word for "juice" or "essence." And RASA stands for "Receive," which means pay attention to the person; "Appreciate," making little noises like "hmm," "oh," "OK"; "Summarize" -- the word "so" is very important in communication; and "Ask," ask questions afterwards.
आणि शेवटी, एक संक्षिप्त शब्द. आपण हा श्रवण करताना, संवाद साधताना वापरू शकता. जर तुम्ही त्यापैकी कुठल्याही भूमिकेत असाल -- आणि मला वाटतं हे व्याख्यान ऐकणारा प्रत्येकजण त्यात आहे -- तो संक्षिप्त शब्द आहे RASA. जो एक संस्कृत शब्द आहे "रस" किंवा "सार" यासाठी. आणि RASA म्हणजे "Receive," अर्थात व्यक्तीकडे लक्ष द्या; "Appreciate," म्हणजे "हं," "ओह," "ठीक" असं म्हणणे; "Summarize" -- "सारांशाने" हा शब्द संभाषणात खूप महत्वाचा आहे; आणि "Ask," नंतर प्रश्न विचारा.
Now sound is my passion, it's my life. I wrote a whole book about it. So I live to listen. That's too much to ask for most people. But I believe that every human being needs to listen consciously in order to live fully -- connected in space and in time to the physical world around us, connected in understanding to each other, not to mention spiritually connected, because every spiritual path I know of has listening and contemplation at its heart.
ध्वनीची मला अतिशय आवड आहे, ते माझं जीवन आहे. मी त्यावर एक पूर्ण पुस्तक लिहीलं आहे. मी श्रवणासाठी जगतो. बऱ्याच लोकांना ती अतिशयोक्ती वाटते. पण मी हे मानतो कि प्रत्येक मानवाने जाणीवपूर्वक श्रवण करण्याची गरज आहे परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी -- आपल्या भोवतालच्या भौतिक जगाशी अवकाश आणि काळाने जोडलेलं, एकमेकांना समजून घेण्यात जोडलेलं, आणि अर्थातच अध्यात्माशी जोडलेलं, कारण मला महित असलेल्या अध्यात्माच्या प्रत्येक मार्गाच्या मुळाशी श्रवण आणि चिंतन आहे.
That's why we need to teach listening in our schools as a skill. Why is it not taught? It's crazy. And if we can teach listening in our schools, we can take our listening off that slippery slope to that dangerous, scary world that I talked about, and move it to a place where everybody is consciously listening all the time, or at least capable of doing it.
म्हणूनच आपल्या शाळांमध्ये श्रवण हे एक कौशल्य म्हणून शिकवण्याची गरज आहे. ते का शिकवलं जात नाही? हे अतर्क्य आहे. आणि जर आपण श्रवण शाळांमध्ये शिकवू शकलो, तर आपण आपलं श्रवण त्या भयंकर, भीषण जगाकडे, ज्याबद्दल मी बोललो, जाणाऱ्या निसरड्या उतारावरून हटवू शकतो आणि अशा जागी हलवू शकतो जेथे प्रत्येकजण नेहमी जाणीवपूर्वक श्रावण करतो आहे, किंवा ते करण्याची क्षमता बाळगून आहे.
Now, I don't know how to do that, but this is TED, and I think the TED community is capable of anything. So I invite you to connect with me, connect with each other, take this mission out. And let's get listening taught in schools, and transform the world in one generation to a conscious, listening world -- a world of connection, a world of understanding and a world of peace.
आता, मला हे महित नाही ते कसं करायचं, पण हे TED आहे, आणि मला वाटतं TED समुदाय काहीही करू शकतो. म्हणून मी आपल्याला माझ्याशी जोडले जाण्याची, आपापसांत जोडले जाण्याची कार्यप्रसारणासाठी विनवतो. आणि शाळांमध्ये श्रवण शिकवण्याचा आग्रह धरू या आणि एका पिढीतील जग परिवर्तीत करू या एका सचेतन, श्रवण करणाऱ्या जगात -- एक संबंधांचं जग, एक समजूतदार जग आणि एक शांततामय जग.
Thank you for listening to me today.
आज माझं ऐकून घेतल्याबद्दल आभारी आहे.
(Applause)
(टाळ्या)