I grew up with my identical twin, who was an incredibly loving brother. Now, one thing about being a twin is, it makes you an expert at spotting favoritism. If his cookie was even slightly bigger than my cookie, I had questions. And clearly, I wasn't starving.
मी आणि माझा जुळा भाऊ. आम्ही एकत्रच लहानाचे मोठे झालो. माझा हा भाऊ खूप प्रेमळ आहे. आपण जुळ्यांपैकी एक असलो, की पक्षपातीपणा चट्कन ओळखायला शिकतो. त्याला माझ्यापेक्षा जरासं मोठं बिस्कीट मिळालं, की माझे प्रश्न सुरु होत. तशी माझी काही उपासमार होत नव्हती, हे उघडच आहे.
(Laughter)
(हशा)
When I became a psychologist, I began to notice favoritism of a different kind; and that is, how much more we value the body than we do the mind. I spent nine years at university earning my doctorate in psychology, and I can't tell you how many people look at my business card and say, "Oh -- a psychologist. So, not a real doctor," as if it should say that on my card.
मोठेपणी मानसशास्त्रज्ञ झाल्यावर एक वेगळा पक्षपातीपणा माझ्या लक्षात येऊ लागला. आणि तो म्हणजे, आपण मनापेक्षा शरीराला किती जास्त महत्त्व देतो. विद्यापीठात नऊ वर्षं परिश्रम करून मी मानसशास्त्रातली डॉक्टरेट मिळवली. पण तुम्हांला काय सांगू, माझं कार्ड बघून कितीतरी लोक म्हणतात, अरे ! मानसशास्त्स्त्रज्ञ म्हणजे खरा डॉक्टर नाही.. म्हणजे कार्डावर तसं छापायला हवं का?
[Dr. Guy Winch, Just a Psychologist (Not a Real Doctor)]
डॉ. गाय विंच. नुसतेच मानसशास्त्रज्ञ. (खरे डॉक्टर नव्हेत.)
(Laughter)
(हशा)
This favoritism we show the body over the mind -- I see it everywhere.
आपण शरीराच्या बाजूने पक्षपातीपणा करतो, हे मला सर्वत्र पाहायला मिळतं.
I recently was at a friend's house, and their five-year-old was getting ready for bed. He was standing on a stool by the sink, brushing his teeth, when he slipped and scratched his leg on the stool when he fell. He cried for a minute, but then he got back up, got back on the stool, and reached out for a box of Band-Aids to put one on his cut. Now, this kid could barely tie his shoelaces, but he knew you have to cover a cut so it doesn't become infected, and you have to care for your teeth by brushing twice a day. We all know how to maintain our physical health and how to practice dental hygiene, right? We've known it since we were five years old. But what do we know about maintaining our psychological health? Well, nothing. What do we teach our children about emotional hygiene? Nothing. How is it that we spend more time taking care of our teeth than we do our minds? Why is it that our physical health is so much more important to us than our psychological health?
मी एका मित्राच्या घरी गेलो होतो. त्यांचा ५ वर्षांचा मुलगा झोपण्यापूर्वी दात घासण्यासाठी सिंकजवळ स्टूलवर चढला. तो पाय घसरून पडला, आणि त्याला खरचटलं. तो मिनिटभर रडला, पण मग उठून परत स्टूलवर चढला, आणि जखमेवर लावायला त्याने बँडेड शोधून काढली. या मुलाला अजून बुटाची नाडीसुद्धा नीट बांधता येत नाही. पण त्याला ठाऊक आहे, की जखमेवर पट्टी लावली तर जंतुसंसर्ग होणार नाही. तसंच, दातांची काळजी घेण्यासाठी ते दिवसातून दोनदा घासायला हवेत. आरोग्याची आणि दातांची काळजी कशी घ्यावी,हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे, हो ना? अगदी वयाच्या पाचव्या वर्षापासून. पण मानसिक आरोग्याविषयी आपल्याला काय माहिती आहे? काहीही नाही. मानसिक आरोग्याविषयी आपण आपल्या मुलांना काय शिकवतो? काहीही नाही. जितका वेळ दातांची काळजी घेण्यात घालवतो, तितकाही आपण मनासाठी देत नाही. असं का? आपण आपलं शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्यापेक्षा जास्त महत्त्वाचं का मानतो?
We sustain psychological injuries even more often than we do physical ones, injuries like failure or rejection or loneliness. And they can also get worse if we ignore them, and they can impact our lives in dramatic ways. And yet, even though there are scientifically proven techniques we could use to treat these kinds of psychological injuries, we don't. It doesn't even occur to us that we should. "Oh, you're feeling depressed? Just shake it off; it's all in your head." Can you imagine saying that to somebody with a broken leg: "Oh, just walk it off; it's all in your leg."
मनावरचे आघात शारीरिक जखमांपेक्षा जास्त टिकतात. उदाहरणार्थ, अपयश, अवहेलना, किंवा एकटेपणा. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, तर ते वाढत जातात. आपल्या आयुष्यावर त्यांचा अकल्पित परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारच्या मानसिक जखमांसाठी वैज्ञानिक पुराव्याने सिद्ध केलेले उपचार उपलब्ध असूनही आपण ते वापरत नाही. तसे ते वापरावेत, असं आपल्याला सुचतसुद्धा नाही. "नैराश्य आलं आहे का? झटकून टाक ते. काहीतरी भरून घेतलं आहेस डोक्यात." कल्पना करा, एखाद्याचा पाय मोडला आहे. त्याला आपण सांगतो आहोत, "चल, झटक पाय, आणि चाल. काहीतरी भरून घेतलं आहेस पायात."
(Laughter)
(हशा)
It is time we closed the gap between our physical and our psychological health. It's time we made them more equal, more like twins.
शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य यामधली दरी बुजवण्याची वेळ आली आहे. जुळ्या भावंडांप्रमाणे त्यांना समान लेखण्याची वेळ आली आहे.
Speaking of which, my brother is also a psychologist. So he's not a real doctor, either.
सांगायची गोष्ट म्हणजे, माझा भाऊ सुद्धा मानसशास्त्रज्ञ आहे. म्हणजे तोही खरा डॉक्टर नव्हेच.
(Laughter)
(हशा)
We didn't study together, though. In fact, the hardest thing I've ever done in my life is move across the Atlantic to New York City to get my doctorate in psychology. We were apart then for the first time in our lives, and the separation was brutal for both of us. But while he remained among family and friends, I was alone in a new country. We missed each other terribly, but international phone calls were really expensive then, and we could only afford to speak for five minutes a week. When our birthday rolled around, it was the first we wouldn't be spending together. We decided to splurge, and that week, we would talk for 10 minutes.
पण आम्ही एकत्र शिक्षण घेतलं नाही. मानसशास्त्रातली डॉक्टरेट मिळवण्यासाठी मी अटलांटिक समुद्र ओलांडून न्यू यॉर्क शहरात गेलो. माझ्या आयुष्यातली सर्वात कठीण गोष्ट. त्यावेळी प्रथमच आमची ताटातूट झाली. आम्हांला दोघांनाही ती सहन झाली नाही. निदान तो घरी कुटुंब आणि मित्रांच्या सोबतीतच राहिला, पण मी तर एका नव्या देशात एकटा राहत होतो. आम्हांला एकमेकांची फार आठवण येई. त्यावेळी फोनवरून दुसऱ्या देशात बोलणं प्रचंड महाग होतं. आम्हांला आठवड्याला फक्त पाच मिनिटं बोलणं परवडत असे. त्या वर्षी प्रथमच आम्ही आमच्या वाढदिवसाला एकत्र नव्हतो. म्हणून आम्ही ठरवलं, या आठवड्यात चैन करू. १० मिनिटं बोलू.
(Laughter)
(हशा)
I spent the morning pacing around my room, waiting for him to call -- and waiting ... and waiting. But the phone didn't ring. Given the time difference, I assumed, "OK, he's out with friends, he'll call later." There were no cell phones then. But he didn't. And I began to realize that after being away for over 10 months, he no longer missed me the way I missed him. I knew he would call in the morning, but that night was one of the saddest and longest nights of my life. I woke up the next morning. I glanced down at the phone, and I realized I had kicked it off the hook when pacing the day before. I stumbled out of bed, I put the phone back on the receiver, and it rang a second later. And it was my brother, and boy, was he pissed.
सकाळभर मी खोलीत येरझारे घालत होतो. त्याचा फोन येण्याची वाट पाहत होतो. फार वाट पाहिली. फार वाट पाहिली. पण फोन आलाच नाही. दोन्ही देशांतल्या वेळांत फरक असल्यामुळे मला वाटलं, मित्रांबरोबर गेला असेल. करेल नंतर. त्या वेळी मोबाईल नव्हते. पण त्याचा फोन आलाच नाही. मग वाटलं, १० महिने दूर राहिल्यावर त्याला माझी तितकीशी आठवण येत नसावी. सकाळीच यायला हवा होता तो फोन रात्रीपर्यंत आला नाही. रात्र संपता संपेना. मी तळमळत होतो. दुसऱ्या दिवशी जाग आल्याबरोबर फोन दिसला, आणि माझ्या लक्षात आलं, की आदल्या दिवशी येरझारे घालताना माझ्याच लाथेने रिसिव्हर खाली पडला होता. मी धडपडत उठलो, आणि रिसिव्हर जागेवर ठेवला. पुढच्याच क्षणी फोन वाजला. हो, माझ्या भावाचाच. किती चिडला होता तो!=
(Laughter)
(हशा)
It was the saddest and longest night of his life as well. Now, I tried to explain what happened, but he said, "I don't understand. If you saw I wasn't calling you, why didn't you just pick up the phone and call me?" He was right. Why didn't I call him? I didn't have an answer then. But I do today, and it's a simple one: loneliness.
त्यानेही ती रात्र तळमळत काढली होती. काय झालं, ते त्याला समजवायचा मी प्रयत्न केला. "मला हे समजत नाही, की माझा कॉल आला नाही, तर तू फोन उचलून मला का केला नाहीस?" बरोबरच होतं त्याचं. मी त्याला फोन का केला नाही? या प्रश्नाचं उत्तर त्यावेळी नव्हे, पण आज मला मिळालं. आणि ते अगदी सोपं आहे. एकटेपणा.
Loneliness creates a deep psychological wound, one that distorts our perceptions and scrambles our thinking. It makes us believe that those around us care much less than they actually do. It make us really afraid to reach out, because why set yourself up for rejection and heartache when your heart is already aching more than you can stand? I was in the grips of real loneliness back then, but I was surrounded by people all day, so it never occurred to me. But loneliness is defined purely subjectively. It depends solely on whether you feel emotionally or socially disconnected from those around you. And I did. There is a lot of research on loneliness, and all of it is horrifying. Loneliness won't just make you miserable; it will kill you. I'm not kidding. Chronic loneliness increases your likelihood of an early death by 14 percent. Fourteen percent! Loneliness causes high blood pressure, high cholesterol. It even suppress the functioning of your immune system, making you vulnerable to all kinds of illnesses and diseases. In fact, scientists have concluded that taken together, chronic loneliness poses as significant a risk for your long-term health and longevity as cigarette smoking. Now, cigarette packs come with warnings saying, "This could kill you." But loneliness doesn't. And that's why it's so important that we prioritize our psychological health, that we practice emotional hygiene. Because you can't treat a psychological wound if you don't even know you're injured. Loneliness isn't the only psychological wound that distorts our perceptions and misleads us.
एकटेपणा मनावर खोल आघात करतो. त्यामुळे आकलनशक्ती विपरीत कार्य करते. विचारांचा गोंधळ उडतो. कोणालाच आपली पर्वा नाही, असं वाटतं. प्रत्यक्षात तसं नसलं, तरीही. इतरांशी संपर्क साधायची फार भीती वाटते. कारण, आपण नाकारले जाऊ, मग दुःख होईल. आधीच दुःख असह्य झालं आहे. आणखी नको. त्या काळात मला खरोखरच एकटेपणाने गिळून टाकलं होतं. पण दिवसभर माणसांच्यात वावरत असल्याने ते माझ्या लक्षात आलं नाही. एकटेपणाची व्याख्या माणसागणिक निराळी असते. आपल्याला इतरांपासून भावनिक किंवा सामाजिक दृष्ट्या तुटल्यासारखं वाटतं का, यावर ते अवलंबून आहे. मला तसं वाटत होतं. एकटेपणावर पुष्कळ संशोधन झालं आहे. ते फार भयंकर आहे. एकटेपणामुळे आयुष्य दुःखी होतं. मृत्यू ओढवू शकतो. ही थट्टा नव्हे. दीर्घकाळ एकटेपणा सहन केल्यामुळे अकाली मृत्यूचं प्रमाण १४ टक्क्यांनी वाढतं. १४ टक्के! एकटेपणामुळे रक्तदाब वाढतो. कोलेस्टेरॉल वाढतं. शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे अनेक आजार आणि रोग होऊ शकतात. यावरून शास्त्रज्ञांनी अनुमान काढलं आहे, की हे सर्व दुष्परिणाम लक्षात घेता, दीर्घकाळ एकटेपणा सहन करणं हे दीर्घायुष्य आणि आरोग्याला धूम्रपानाइतकंच हानिकारक आहे. सिगारेट्सच्या पाकिटावर निदान तसा इशारा दिलेला असतो. पण एकटेपणाचं तसं नाही. म्हणूनच आपण मानसिक आरोग्याला अग्रक्रम देऊन ते सांभाळलं पाहिजे. कारण मनाला जखम झाली आहे हे कळलंच नाही, तर तिच्यावर इलाज कसा करणार? आकलनशक्ती आणि विचार यांच्यावर परिणाम करणारी, एकटेपणा ही काही एकच मानसिक जखम नव्हे.
Failure does that as well. I once visited a day care center, where I saw three toddlers play with identical plastic toys. You had to slide the red button, and a cute doggie would pop out. One little girl tried pulling the purple button, then pushing it, and then she just sat back and looked at the box with her lower lip trembling. The little boy next to her watched this happen, then turned to his box and burst into tears without even touching it. Meanwhile, another little girl tried everything she could think of until she slid the red button, the cute doggie popped out, and she squealed with delight. So: three toddlers with identical plastic toys, but with very different reactions to failure. The first two toddlers were perfectly capable of sliding a red button. The only thing that prevented them from succeeding was that their mind tricked them into believing they could not. Now, adults get tricked this way as well, all the time. In fact, we all have a default set of feelings and beliefs that gets triggered whenever we encounter frustrations and setbacks.
अपयशामुळेही तसं होऊ शकतं. मी एका बालवाडीत गेलो असताना, तिथे तीन मुलं एकसारखी प्लास्टिकची खेळणी घेऊन खेळत होती. लाल बटण सरकवलं, की एक कुत्र्याचं गोंडस पिल्लू बाहेर यायचं. एका मुलीने जांभळं बटण सरकवलं. पिल्लू आलं नाही, तेव्हा ती रडायच्या बेताला आली. दुसरा मुलगा नुसतं तिला पाहूनच रडू लागला. तिसऱ्या मुलीने सगळी बटणं सरकावून पाहिली. लाल बटण सरकावल्यावर पिल्लू बाहेर आलं, आणि ती आनंदाने ओरडू लागली. अपयशाला तोंड देण्याच्या तीन मुलांच्या या तीन तऱ्हा. पहिल्या दोन मुलांना लाल बटण सरकावणं सहज शक्य होतं. पण त्यांनी तसं केलं नाही. कारण, त्यांच्या मनाने त्यांची फसगत केली. त्यामुळे त्यांना ते अशक्य वाटलं. मोठ्या माणसांचीही अशी फसगत होत असते. प्रत्येक व्यक्तीच्या मनात, भावना आणि समज यांचे ठराविक साचे बनलेले असतात. अपयश किंवा निराशा पदरी आली, की आपण त्यानुसार वागतो.
Are you aware of how your mind reacts to failure? You need to be. Because if your mind tries to convince you you're incapable of something, and you believe it, then like those two toddlers, you'll begin to feel helpless and you'll stop trying too soon, or you won't even try at all. And then you'll be even more convinced you can't succeed. You see, that's why so many people function below their actual potential. Because somewhere along the way, sometimes a single failure convinced them that they couldn't succeed, and they believed it.
तुमचं मन अपयशाला कसा प्रतिसाद देतं, हे तुम्हांला ठाऊक आहे का? असायला हवं. कारण, जर तुमच्या मनाने तुम्हाला पटवलं, की हे काम तू करू शकणार नाहीस, आणि तुम्हांला ते पटलं, तर त्या दोन मुलांप्रमाणे तुम्ही स्वतःला असहाय मानू लागाल. मग तुम्ही लगेच प्रयत्न थांबवाल, किंवा मुळात प्रयत्न करणारच नाही. आणि मग तर तुमची खात्रीच पटेल, की आपण यशस्वी होऊच शकत नाही. यामुळेच कित्येक लोक त्यांच्या क्षमतेपेक्षा पुष्कळ खालच्या दर्जाचं काम करतात. कारण, पूर्वीच्या एखाद्या अपयशाने त्यांना पटवलेलं असतं, की आपण यशस्वी होऊ शकत नाही. आणि ते त्यांना पटलेलं असतं.
Once we become convinced of something, it's very difficult to change our mind. I learned that lesson the hard way when I was a teenager with my brother. We were driving with friends down a dark road at night, when a police car stopped us. There had been a robbery in the area and they were looking for suspects. The officer approached the car, and shined his flashlight on the driver, then on my brother in the front seat, and then on me. And his eyes opened wide and he said, "Where have I seen your face before?"
आपल्या मनाला एखादी गोष्ट पटली, की तो समज बदलणं फार कठीण असतं. हे एका कठीण प्रसंगातून मी शिकलो. त्या वेळी मी तरुण होतो, भावासोबत होतो. त्या रात्री आम्ही काही मित्रांसोबत मोटारीत बसून चाललो होतो. पोलिसांच्या गाडीने आम्हांला अडवलं. त्या भागात एक चोरी झाली होती, आणि ते चोरांना शोधत होते. एका पोलिसाने आमची गाडी चालवणाऱ्या मित्रावर विजेरीचा झोत टाकला. पुढच्या सीटवरच्या माझ्या भावावरही टाकला. त्यानंतर मागे, माझ्यावर. त्याचे डोळे विस्फारले. त्याने विचारलं, "तुला मी याआधी पाहिलं आहे. कुठे बरं ?"
(Laughter)
(हशा)
And I said, "In the front seat."
मी म्हणालो, "पुढच्या सीटवर."
(Laughter)
(हशा)
But that made no sense to him whatsoever, so now he thought I was on drugs.
त्याला काहीही कळलं नाही. त्याला वाटलं, की मी ड्रग्ज घेतली असली पाहिजेत.
(Laughter)
(हशा)
So he drags me out of the car, he searches me, he marches me over to the police car, and only when he verified I didn't have a police record, could I show him I had a twin in the front seat. But even as we were driving away, you could see by the look on his face he was convinced that I was getting away with something.
त्याने मला खेचून बाहेर काढलं. माझी झडती घेतली, आणि मला पोलिसांच्या गाडीजवळ नेलं. माझ्या नावाचं रेकॉर्ड तपासलं. एवढं सगळं झाल्यानंतरच पुढच्या सीटवरचा माझा जुळा भाऊ त्याला दिसला. तरीही मी निघालो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर असे भाव होते, की "यात काहीतरी काळंबेरं आहे. मला फसवून निसटला आहेस तू."
(Laughter)
(हशा)
Our mind is hard to change once we become convinced. So it might be very natural to feel demoralized and defeated after you fail. But you cannot allow yourself to become convinced you can't succeed. You have to fight feelings of helplessness. You have to gain control over the situation. And you have to break this kind of negative cycle before it begins.
मनात एखादा समज घट्ट झाला, की तो बदलणं फार कठीण असतं. अपयश आल्यावर खचून जाणं हे स्वाभाविक आहे. पण आपल्याला कधीच यश मिळणार नाही असा समज होऊ देता कामा नये. असहायतेच्या भावनांचा सामना केला पाहिजे परिस्थितीवर ताबा मिळवला पाहिजे. हे नकारात्मक चक्र सुरु होण्याअगोदरच थांबवलं पाहिजे.
[Stop Emotional Bleeding]
[भावनांना आवर घाला.]
Our minds and our feelings -- they're not the trustworthy friends we thought they were. They're more like a really moody friend, who can be totally supportive one minute, and really unpleasant the next. I once worked with this woman who, after 20 years marriage and an extremely ugly divorce, was finally ready for her first date. She had met this guy online, and he seemed nice and he seemed successful, and most importantly, he seemed really into her. So she was very excited, she bought a new dress, and they met at an upscale New York City bar for a drink. Ten minutes into the date, the man stands up and says, "I'm not interested," and walks out. Rejection is extremely painful. The woman was so hurt she couldn't move. All she could do was call a friend. Here's what the friend said: "Well, what do you expect? You have big hips, you have nothing interesting to say. Why would a handsome, successful man like that ever go out with a loser like you?" Shocking, right, that a friend could be so cruel? But it would be much less shocking if I told you it wasn't the friend who said that. It's what the woman said to herself. And that's something we all do, especially after a rejection. We all start thinking of all our faults and all our shortcomings, what we wish we were, what we wish we weren't. We call ourselves names. Maybe not as harshly, but we all do it. And it's interesting that we do, because our self-esteem is already hurting. Why would we want to go and damage it even further? We wouldn't make a physical injury worse on purpose. You wouldn't get a cut on your arm and decide, "Oh! I know -- I'm going to take a knife and see how much deeper I can make it."
मन आणि भावना यांना आपण आपले विश्वासू मित्र मानतो, पण ते तसे नसतात. ते एखाद्या लहरी मित्रासारखे असतात. लहरीनुसार ते आपल्याला पाठिंबा देऊ शकतात, किंवा आपल्यावर उलटूही शकतात. माझ्याकडे समुपदेशनासाठी आलेल्या एका स्त्रीचं उदाहरण सांगतो. वीस वर्षांच्या संसारानंतर तिचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर तिने आंतरजालावरून दुसरा जोडीदार शोधला, आणि भेट ठरवली. तिला तो अतिशय सुस्वभावी, यशस्वी वाटला. आपण त्याला खरोखर आवडलो आहोत, असंही वाटलं. आनंदाने तिने नवा ड्रेस खरेदी केला, आणि न्यू यॉर्क मधल्या एका महागड्या बार मध्ये भेट ठरवली. दहाव्या मिनिटाला तो उठून उभा राहिला. "आपलं जमेलसं वाटत नाही." म्हणाला, आणि निघून गेला. कोणी आपल्याला नाकारणं फार दुःखदायक असतं. ती हादरून गेली. तिला जागचं हलता येईना. कसाबसा तिने मैत्रिणीला फोन केला. मैत्रीण म्हणाली, "मग? तुझी काय अपेक्षा होती? तुझं वजन किती वाढलं आहे पहा. तुला काही छानसं बोलताही येत नाही. एखादा देखणा, यशस्वी पुरुष तुझ्यासारख्या नालायक बाईला कसा स्वीकारेल?" धक्का बसला ना? मैत्रीण इतकी निर्दयपणे कशी बोलू शकते? पण मी जर सांगितलं, की हे त्या मैत्रिणीने म्हटलं नसून, त्या स्त्रीने स्वतःच म्हटलं होतं, तर तुम्हांला तितकासा धक्का बसणार नाही. आपण सगळे हे असंच करतो. खास करून नकार मिळाल्यावर. आपण आपल्यामधल्या दोष आणि कमतरतांचा विचार करू लागतो. आपण असे असायला हवे होतो, तसे नसायला हवे होतो.. स्वतःला नावं ठेवतो. फार निर्दयीपणे नसेल, पण आपण सगळे असं करतो. खरं तर ही आश्चर्याची गोष्ट आहे. कारण नकारामुळे आधीच आपला आत्मसन्मान दुखावलेला असतो. तरीही आपण स्वतःला आणखी का दुखावतो? शरीराची जखम आपण मुद्दामहून आणखी दुखापत करून वाढवत नाही. हाताला जखम झाली, तर आपण असं नाही म्हणणार, "अरे वा! आता सुरीने आणखी कापून बघू, किती खोल कापता येतं ते!"
But we do that with psychological injuries all the time. Why? Because of poor emotional hygiene. Because we don't prioritize our psychological health. We know from dozens of studies that when your self-esteem is lower, you are more vulnerable to stress and to anxiety; that failures and rejections hurt more, and it takes longer to recover from them. So when you get rejected, the first thing you should be doing is to revive your self-esteem, not join Fight Club and beat it into a pulp. When you're in emotional pain, treat yourself with the same compassion you would expect from a truly good friend.
पण मानसिक जखमा झाल्यावर बरेच वेळा आपण तसं करतो. का? कारण मानसिक आरोग्याची हेळसांड. मानसिक आरोग्याला अग्रक्रम न देणं. डझनावारी संशोधनांनी दाखवून दिलं आहे, की जेव्हा आत्मसन्मान ढासळतो, तेव्हा ताणतणाव आणि चिंताविकार यांना बळी पडण्याचं प्रमाण वाढतं. अपयशामुळे, नाकारलं जाण्यामुळे जास्त दुःख होतं. आणि त्यातून बाहेर पडायला जास्त वेळ लागतो. म्हणून, नाकारलं गेल्यावर प्रथम काय करायला हवं? आत्मसन्मान बळकट करायला हवा. खलनायक बनून त्याच्यावर आणखी वार अजिबात करायचे नाहीत. मनाला दुखापत झाली असेल, तर स्वतःशी दयाळूपणे वागा. जवळच्या मित्राने तुमच्याशी जसं वागावंसं वाटत असेल, तसंच.
[Protect Your Self-Esteem]
[आत्मसन्मानाचं रक्षण करा.]
We have to catch our unhealthy psychological habits and change them. And one of unhealthiest and most common is called rumination. To ruminate means to chew over. It's when your boss yells at you or your professor makes you feel stupid in class, or you have big fight with a friend and you just can't stop replaying the scene in your head for days, sometimes for weeks on end. Now, ruminating about upsetting events in this way can easily become a habit, and it's a very costly one, because by spending so much time focused on upsetting and negative thoughts, you are actually putting yourself at significant risk for developing clinical depression, alcoholism, eating disorders, and even cardiovascular disease.
मानसिक आरोग्याला विघातक ठरणाऱ्या सवयी ओळखून त्या बदलायला हव्यात. यापैकी सर्वत्र आढळणारी एक वाईट सवय म्हणजे रवंथ करणे. म्हणजे तेच तेच विचार पुन्हा पुन्हा मनात घोळवणे. नोकरीत वरिष्ठ आपल्यावर ओरडले असतील, किंवा शिक्षकांनी वर्गात सर्वांसमोर अपमान केला असेल किंवा मित्राशी मोठं भांडण झालं असेल, तर तो प्रसंग अनेक दिवस सतत डोक्यात घोळत राहतो. काही वेळा यात आठवडे निघून जातात. त्रासदायक घटनांबद्दल रवंथ करण्याची सवय सहज लागू शकते. तिची मोठी किंमत मोजावी लागते. कारण नकारार्थी विचार करण्यात इतका वेळ घालवण्यामुळे अनेक विकार जडण्याची शक्यता वाढते. उदाहरणार्थ, नैराश्य, दारूचं व्यसन, अन्नासंबंधी विकार, आणि हृदय आणि रक्तवाहिन्यांचे विकार.
The problem is, the urge to ruminate can feel really strong and really important, so it's a difficult habit to stop. I know this for a fact, because a little over a year ago, I developed the habit myself. You see, my twin brother was diagnosed with stage 3 non-Hodgkin's lymphoma. His cancer was extremely aggressive. He had visible tumors all over his body. And he had to start a harsh course of chemotherapy. And I couldn't stop thinking about what he was going through. I couldn't stop thinking about how much he was suffering, even though he never complained, not once. He had this incredibly positive attitude. His psychological health was amazing. I was physically healthy, but psychologically, I was a mess. But I knew what to do. Studies tell us that even a two-minute distraction is sufficient to break the urge to ruminate in that moment. And so each time I had a worrying, upsetting, negative thought, I forced myself to concentrate on something else until the urge passed. And within one week, my whole outlook changed and became more positive and more hopeful.
यातली समस्या अशी आहे, की विचारांचा रवंथ करण्याची इच्छा प्रबळपणे आणि फार महत्त्वाची वाटू शकते. त्यामुळे ही सवय मोडणं अतिशय कठीण जातं. हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. कारण, साधारण वर्षभरापूर्वी मला स्वतःला ही सवय लागली होती. माझ्या जुळ्या भावाला कॅन्सरचं निदान झालं होतं. त्याचा कॅन्सर अतिशय आक्रमक स्वरूपाचा होता. त्याच्या शरीरावर सगळीकडे सहज दिसतील अशी गळवं आली होती. त्याला तातडीने जोरदार केमोथेरपी सुरु करणं गरजेचं होतं. मला सतत वाटत राहिलं, त्याला काय सहन करावं लागत असेल, त्याला किती त्रास होत असेल. खरं तर त्याने मुळीच तक्रार केली नव्हती. एकदाही नाही. त्याचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक होता. त्याची मानसिक ताकद अफाट होती. मी शरीराने सुदृढ असलो, तरी माझं मन दुबळं होतं. पण मला उपाय ठाऊक होता. संशोधन सांगतं, की विचारांचा रवंथ करण्याची तीव्र इच्छा मोडायला दोन मिनिटांचा व्यत्यय देखील पुरेसा होतो. त्यामुळे दर वेळी नकारात्मक, त्रासदायक, किंवा चिंतादायक विचार मनात आला, की मी दुसरीकडे लक्ष वळवत होतो. ती इच्छा नष्ट होईपर्यंत. एका आठवड्यात माझा दृष्टिकोन बदलून मी जास्त सकारात्मक आणि आशावादी झालो.
[Battle Negative Thinking]
[नकारात्मक विचारांचा सामना करा.]
Nine weeks after he started chemotherapy, my brother had a CAT scan, and I was by his side when he got the results. All the tumors were gone. He still had three more rounds of chemotherapy to go, but we knew he would recover. This picture was taken two weeks ago.
केमोथेरपीनंतर ९ आठवडयांनी माझ्या भावाचा कॅट स्कॅन करण्यात आला. त्याचा निकाल आला तेव्हा मी त्याच्या जवळ होतो. त्याची सर्व गळवं नाहीशी झाली होती. त्याला आणखी तीन वेळा केमोथेरपी करावी लागणार होती. पण तो बरा होणार होता, हे निश्चित. हा दोन आठवड्यांपूर्वीचा फोटो.
By taking action when you're lonely, by changing your responses to failure, by protecting your self-esteem, by battling negative thinking, you won't just heal your psychological wounds, you will build emotional resilience, you will thrive. A hundred years ago, people began practicing personal hygiene, and life expectancy rates rose by over 50 percent in just a matter of decades. I believe our quality of life could rise just as dramatically if we all began practicing emotional hygiene.
एकटेपणा घालवण्यासाठी कृती केल्यामुळे, अपयशाला निराळा प्रतिसाद दिल्यामुळे, आपला आत्मसन्मान बळकट केल्यामुळे, आणि नकारात्मक विचारांचा सामना केल्यामुळे मानसिक जखमा भरून येतात, इतकंच नव्हे, तर मानसिक लवचिकता वाढते, आपण भरभरून जगू शकतो. शंभरेक वर्षांपूर्वी शारीरिक आरोग्याची काळजी घेण्याची सुरुवात झाली, आणि काही दशकांतच मृत्यूदर ५० टक्क्यांनी खाली आला. मला वाटतं, आपण सर्वानी मानसिक आरोग्याची काळजी घेणं सुरु केलं, तर आपल्या आयुष्याचा स्तर असाच वेगाने उंचावेल.
Can you imagine what the world would be like if everyone was psychologically healthier? If there were less loneliness and less depression? If people knew how to overcome failure? If they felt better about themselves and more empowered? If they were happier and more fulfilled? I can, because that's the world I want to live in. And that's the world my brother wants to live in as well. And if you just become informed and change a few simple habits, well -- that's the world we can all live in.
तुम्हांला कल्पना करता येते का? सर्वांचं मानसिक आरोग्य सुधारलं, तर ते जग कसं असेल? एकटेपणा कमी झाला, नैराश्य कमी झालं, तर? लोक अपयशावर मात करायला शिकले, तर? त्यांचा आत्मसन्मान वाढून, आपण सक्षम आहोत असं त्यांना वाटू लागलं तर? त्यांना जास्त आनंद आणि समाधान वाटू लागलं, तर? मी अशी कल्पना करू शकतो. कारण मला अशा जगात राहायचं आहे. माझ्या भावालाही अशा जगात राहायचं आहे. आपण सर्वांनी या माहितीचा वापर करून काही साध्या सवयींमध्ये बदल केले, तर आपण सगळे अशा जगात राहू शकू.
Thank you very much.
खूप खूप धन्यवाद.
(Applause)
(टाळ्या)