Everyone, please think of your biggest personal goal. For real -- you can take a second. You've got to feel this to learn it. Take a few seconds and think of your personal biggest goal, okay? Imagine deciding right now that you're going to do it. Imagine telling someone that you meet today what you're going to do. Imagine their congratulations, and their high image of you. Doesn't it feel good to say it out loud? Don't you feel one step closer already, like it's already becoming part of your identity?
लोकहो, तुम्ही आपले सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे ध्येय मनात आणा. लोकहो, तुम्ही आपले सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे ध्येय मनात आणा. खरच आणा. थोडा वेळ घ्या, वाटल्यास. ही गोष्ट शिकण्यासाठी हा प्रयोग करणे जरुरी आहे. काही सेकंद घालवून तुमचे सर्वात मोठे व्यक्तिगत ध्येय आठवाल का? त्यानंतर अशी कल्पना करा की ते ध्येय गाठायचा तुम्ही पक्का निर्णय करताहात. पुढे अशीही कल्पना करा की आज तुम्ही कुणाला तरी भेटताहात आणि त्यांना तुमचे ध्येय वर्णन करून सांगताहात. मग ते कसे तुमचे अभिनंदन करताहेत, तुमच्याबद्दल कसे आदर व्यक्त करत आहेत, त्याचाही विचार करा. आपले ध्येय बोलून दाखवताना किती छान वाटते नाही? आपण ते ध्येय गाठण्याच्या अगदी जवळ आलो, असं वाटते ना, जणू ती गोष्ट तुमच्या वस्तुस्थितीत साकार झाली आहे?
Well, bad news: you should have kept your mouth shut, because that good feeling now will make you less likely to do it. The repeated psychology tests have proven that telling someone your goal makes it less likely to happen. Any time you have a goal, there are some steps that need to be done, some work that needs to be done in order to achieve it. Ideally you would not be satisfied until you'd actually done the work. But when you tell someone your goal and they acknowledge it, psychologists have found that it's called a "social reality." The mind is kind of tricked into feeling that it's already done. And then because you've felt that satisfaction, you're less motivated to do the actual hard work necessary.
पण एक वाईट बातमी आहे: तुम्ही आपले तोंड बंद ठेवायला हवे होते, कारण त्या आनंदाचा परिणाम असा होतो की तुम्ही ते काम पूर्ण करायची शक्यता कमी होते! मानसशास्त्रज्ञांनी कित्येक वेळा चाचण्या घेऊन हे सिद्ध केले आहे की लोकांना जाहीर केलेले तुमचे ध्येय पूर्ण व्हायची शक्यता कमी होते. कुठलेही ध्येय साध्य करण्यासाठी काही पाऊले टाकावी लागतात. काही मेहनत करावी लागते त्यासाठी. ते काम पुरे होईपर्यंत तुम्ही समाधान मानू नये, हेच उत्तम होईल. पण जेंव्हा तुम्ही कुणाला तुमचे ध्येय सांगता, तेंव्हा ज्याला मानसशास्त्रज्ञ सामाजिक वस्तुस्थिती (social reality) म्हणतात ती तयार होते. आपल्या मनाची अशी गैरसमजूत होते की सगळे काम पूर्ण झालेले आहे. मग आधीच ते समाधान मिळाल्यामुळे तुमची झटून काम करायची
(Laughter)
प्रेरणा कमी होते.
So this goes against conventional wisdom that we should tell our friends our goals, right? So they hold us to it.
प्रचलित समज आहे ना--की आपले ध्येय मित्रांना सांगावे, मग ते आपली मदत करतील--आणि हे माझे सांगणे त्याच्या अगदी विरुद्ध नाही का?
So, let's look at the proof. 1926: Kurt Lewin, founder of social psychology, called this "substitution." 1933: Wera Mahler found when it was acknowledged by others, it felt real in the mind. 1982, Peter Gollwitzer wrote a whole book about this, and in 2009, he did some new tests that were published.
तर आता याचा पुरावा बघूया. सन १९२६ - कर्ट ल्युविन (Kurt Lewin)--"सामाजिक मानसशास्त्र" (social psychology) या विषयाचे स्थापक--याला "अदलाबदल" (substitution) म्हणतात. सन १९३३ - व्हेरा माहलर (Vera Mahler) दाखवतात की दुसऱ्यांनी मान्य केलेली कल्पना आपल्या डोक्यात खरी वाटते. सन १९८२ - पीटर गोलविट्झर (Peter Gollwitzer) या विषयावर एक संपूर्ण पुस्तक लिहितात, आणि २००९ सालात काही नवे शोध प्रसिद्ध करतात.
It goes like this: 163 people across four separate tests. Everyone wrote down their personal goal. Then half of them announced their commitment to this goal to the room, and half didn't. Then everyone was given 45 minutes of work that would directly lead them towards their goal, but they were told that they could stop at any time. Now, those who kept their mouths shut worked the entire 45 minutes on average, and when asked afterward, said that they felt that they had a long way to go still to achieve their goal. But those who had announced it quit after only 33 minutes, on average, and when asked afterward, said that they felt much closer to achieving their goal.
ते असे: १६३ माणसांच्या ४ वेगवेगळ्या चाचण्या त्यांनी घेतल्या; सर्वांनी आपले व्यक्तिगत ध्येय लिहून काढले. त्यातील अर्ध्या लोकांनी आपले ध्येय सर्वांना जाहीर केले व उरलेल्या अर्ध्या लोकांनी ते गुप्त ठेवले. सर्वांना ४५ मिनिटांचे आपआपले काम करायला दिले, जे त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आवश्यक होते, पण सर्वांना कधीही काम बंद करायची परवानगी होती. ज्यांनी आपले ध्येय गुप्त ठेवले होते, त्यांनी सरासरी ४५ मिनिटे काम केले असे दिसले. त्याबद्दल नंतर विचारले असता ते म्हणाले की काम अजून खूप बाकी आहे असे त्यांना वाटत होते. पण ज्यांनी आपले ध्येय सर्वांना बोलून दाखवले होते, त्यांनी सरासरी ३३ मिनिटेच काम केले. त्याबद्दल नंतर विचारले असता ते म्हणाले की त्यांचे ध्येय अगदी जवळ आल्यासारखे त्यांना वाटत होते.
So if this is true, what can we do? Well, you could resist the temptation to announce your goal. You can delay the gratification that the social acknowledgment brings, and you can understand that your mind mistakes the talking for the doing. But if you do need to talk about something, you can state it in a way that gives you no satisfaction, such as, "I really want to run this marathon, so I need to train five times a week and kick my ass if I don't, okay?"
जर का हे खरे असेल, तर आपण काय करायला हवे? आपण आपल्या ध्येयाची घोषणा करण्याचा मोह टाळायला हवा. आपण आपल्या ध्येयाची घोषणा करण्याचा मोह टाळायला हवा. इतरांना सांगितल्याचे समाधान व मान्यता मिळवण्याचा आनंद तुम्ही दूर ठेवू शकता. तुम्ही ही जाणीव ठेवायला हवी की आपले मन काम करण्याऐवजी त्याबद्दल बोलण्यातच तृप्त होते! पण जर का आपले ध्येय कुणाला सांगायची अगदी तीव्र इच्छा झालीच, तर ते अशा प्रकारे सांगा की त्या सांगण्यातून तुम्हाला काहीच समाधान मिळणार नाही! असे काहीसे सांगा: "मला खरच marathon (२६ मैल) शर्यतीमध्ये भाग घ्यायचा आहे, म्हणून मला दर आठवड्याला पाच वेळा सराव केला पाहिजे. जर तो सराव मी नाही केला तर मला कुल्ल्यावर लाथ मारा."
So audience, next time you're tempted to tell someone your goal, what will you say?
तर श्रोतेहो, इथून पुढे, जेंव्हा तुम्हाला आपले ध्येय कोणालातरी सांगायचा मोह होईल, तेंव्हा तुम्ही त्यांना काय सांगाल?
(Silence)
बरोबर. असेच गप्प रहा. शाब्बास!
Exactly! Well done.
(Laughter)
(Applause)
(टाळ्या)